

Floor Control Infractions: Tracking the Physical Altercation Over the Bopodi Structural Demolition Issue
Sakal
पुणे ः पाणी कपातीमुळे पुण्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असल्याने नगरसेवकांकडून पुणेकरांच्या वतीने कैफियत मांडली जात होती, प्रशासनाला जाब विचारला जात होता. त्यावर आयुक्तांकडून आश्वासन असा खुलासा मिळेल या प्रतिक्षेत नगरसेवक होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक गफूर पठाण यांनी पाण्याच्या विषयावर बोलतानाच बोपोडील दर्ग्यावरील कारवाईचा विषय काढताच भाजपचे नगरसेवक त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणात जोरदार वादंग झाल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली अन् ६० लाख पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय अनुत्तरीत राहिला.