
पुणे : पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची चाळण होते. वर्षभर रस्त्यांवर अनेक ठिकणी खड्डे पडलेले असतात. रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होतात. पण नागरिकांना तक्रार करता येत नाहीत. त्यामुळे आता ‘पीएमसी रोड मित्र’ हे मोबाईल ॲप तयार केले आहे. त्याद्वारे फोटोंसोबत खड्ड्यांच्या ठिकाणचे अक्षांश आणि रेखांशही कळणार असून आयुक्तांचे यावर नियंत्रण असल्याने प्रशासनाला त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. लवकरच या ॲपचे उद्घाटन होणार आहे.