

Eleven Illegal PG Hostels Sealed in Lohegaon by PMC
Sakal
पुणे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या अनधिकृत पेईंग गेस्ट (पीजी) आणि हॉस्टेलविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. लोहगाव आणि निंबाळकर नगर भागात तपासणीदरम्यान अग्निशामक यंत्रणा आणि पालिकेची कोणतीही परवानगी नसलेले ११ पीजी हॉस्टेल शुक्रवारी सील करण्यात आले. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा विनापरवाना हॉस्टेलच्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत.