

Final Countdown: Only Six Days Left to Avail PMC Property Tax Rebate
पुणे : महापालिकेच्या मिळकतकर सवलतीचा लाभ घेण्यासाठी शेवटचे सहा दिवस शिल्लक आहेत. ३१ मे नंतर मिळकतकरावरील ५ ते १० टक्क्यांची सवलत बंद होणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अजूनपर्यंत कराची रक्कम भरलेली नाही, त्यांनी त्वरित रक्कम भरावी असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान १ एप्रिलपासून २५ मे पर्यंत ४.९६ लाख मिळकतधारकांनी ८४६.७८ कोटींचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.