
पुणे : महापालिका प्रशासनाकडून मिळकतकर भरण्यासंदर्भात वारंवार सूचना देऊनही एकूण मिळकतकरधारकांपैकी सुमारे साडेसात लाखइतक्या मालमत्ताधारकांकडून मिळकतकर भरण्याकडे पाठ फिरवली जात आहे. त्यामध्ये शासकीय संस्थांसारख्या थकबाकी न मिळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. असे असले तरीही हजारो कोटी रुपये मिळकतकराच्या थकबाकीचा महसूल तिजोरीत येण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली आहे. त्यासाठी मालमत्ता जप्ती, नळजोड तोडणे, लिलावासारख्या कारवाईवर भर देण्यासह अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांना थकबाकी गोळा करण्यासाठीचे लक्ष्य देण्यावर आता भर देण्यात आला आहे.