

pune latest news
esakal
Pune Breaking News: पुणे महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पाची तयारी सुरु असताना त्यामध्ये उत्पन्नवाढीसाठी मिळकतकरात ८ ते १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीच्या समोर ठेवला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांवरील कराचा बोजा वाढणार आहे. मात्र, याचा अंतिम निर्णय नव्याने निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांना घ्यावा लागणार आहे. त्याचा निर्णय ते काय घेतात याकडे लक्ष लागले आहे.