

PMC contract worker insurance
sakal
पुणे : पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे यासाठी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या सुधारणांमुळे एका कामगाराच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. निवांत अवसरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची रोख मदत महापालिकेने व ठेकेदाराने केली आहे. त्यामुळे घरातील कर्त्याव्यक्तीच्या अपघाती निधनामुळे कोलमडलेला संसार पुन्हा सावकरण्यासाठी ही मदत महत्वाची ठरणार आहे.