
पुणे - पुणे महापालिकेच्या स्थापत्य शाखेतील कनिष्ठ अभियंता (वर्ग-३) पदांसाठी रखडलेली भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. या पद भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे आता सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, तसेच यापूर्वी ११३ जागांची भरती केली जाणार होती, आता १६९ जागांची भरती होणार आहे.