

Pune civic engineers ordered to inspect roads on two-wheelers daily to identify potholes and road safety issues.
esakal
पुणे : पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे आवश्यक होते. पण हे काम झाले नसल्याने व टीकेची झोड उठल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. कनिष्ठ अभियंत्यांपासून कार्यकारी अभियंत्यांपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी चारचाकी वाहनांऐवजी दररोज दुचाकीवरून रस्त्यांची पाहणी करावी, असे आदेश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी काढले आहेत. त्यामुळे ‘वरातीमागून घोडे’ अशीच अवस्था महापालिका प्रशासनाची झाली आहे.