Sinhgad Institute : पुणे महापालिकेचा सिंहगड शिक्षण संस्थेला दणका; २९५ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याचा प्रस्ताव

Pune Municipal Corporation Action Against Sinhgad Institute Property Tax Dues : सिंहगड शिक्षण संस्थेच्या थकीत मिळकतकर वसुलीसाठी पुणे महापालिकेने कारवाईची तयारी केली आहे. संस्थेच्या ३३ मिळकतींवर मालमत्ता बोजा चढविण्याचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
Pune Municipal Corporation Action Against Sinhgad Institute Property Tax Dues

Pune Municipal Corporation Action Against Sinhgad Institute Property Tax Dues

esakal

Updated on: 

पुणे : महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मिळकतकर थकविणाऱ्या सिंहगड इन्स्टिट्यूट शिक्षण संस्थेविरोधात महापालिकेने आता कठोर कारवाईची तयारी सुरू केली आहे. संस्थेच्या ३३ मिळकतींवर मालमत्ता बोजा (बर्डन) चढविण्याचा प्रस्ताव मिळकतकर आकारणी विभागाने तयार केला आहे. संबंधित प्रस्ताव मान्यतेसाठी अतिरिक्त आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित मिळकतींच्या लिलाव प्रक्रियेच्या दिशेने महापालिकेची पावले पडण्याची शक्‍यता आहे.

Loading content, please wait...