Water Tanker
sakal
पुणे - शहरात पाणीकपातीमुळे टँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना समान पाणी देण्याची महापालिकेची क्षमता अजूनही तयार झाली नाही. अशा स्थितीत टँकरचालकांकडून लूटमार सुरू आहे. हे थांबविण्यासाठी महापालिका लवकरच कॅबप्रमाणे टँकर बुक करता येणारे ‘विशेष ॲप’ सुरू करत आहे. पुढील दोन महिन्यांत हे ॲप पुणेकरांच्या सेवेत येणार आहे.