Pune Municipal Corporation Standing Committee Members 2026
sakal
पुणे
Pune News : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे १२ सदस्य; विरोधकांची रणनीती काय, कोणाला मिळाली संधी?
Pune Municipal Corporation Standing Committee Members 2026 : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची घोषणा महापौर मंजूषा नागपुरे यांनी केली. भाजपचे १२, राष्ट्रवादीचे ३ आणि काँग्रेसचा १ सदस्य निवडला. भाजपने अनेक इच्छुकांना डावलल्याने नाराजी वाढली असून विरोधकांनीही रणनीती आखली.
पुणे : पुणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समितीचे १२ सदस्य निवडताना भाजपने धक्कातंत्राचा वापर केला. स्थायीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या श्रीनाथ भिमाले यांचा अपवाद वगळता अन्य इच्छुकांना समितीमध्ये यंदा स्थान दिले नाही. तसेच सर्वच पक्षांनी स्थायी समितीमध्ये जुन्या हद्दीतील उपनगरे, समाविष्ट गावातील १३ नगरसेवकांना संधी दिली आहे. तर राष्ट्रवादीने अमोल बालवडकर, काँग्रेसने प्रशांत जगताप यांना संधी देऊन स्थायीमध्ये भाजपची डोकेदुखी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

