पुणे : महापालिका काढणार बाराशे घरांची लॉटरी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेने सुरू केलेल्या प्रकल्पांमधील ११८९ घरांसाठी लॉटरी काढली
Under Prime Minister Housing Lotter
Under Prime Minister Housing Lottersakal

पुणे : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेने सुरू केलेल्या प्रकल्पांमधील ११८९ घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. यासाठी महापालिकेकडे तब्बल १६ हजार ५०० अर्ज आलेले आहेत. या घरांची लॉटरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काढली जाण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेतर्फे खराडी, वडगाव बुद्रूक येथे प्रत्येकी एक आणि हडपसर येथे तीन पतंप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रकल्प सुरू केले आहेत. महापालिकेचा हा प्रकल्प सुमारे ३२५ कोटी रुपयांचा असून, आत्तापर्यंत खराडी व वडगाव बुद्रूक येथील प्रकल्पाचे काम ५० टक्के पेक्षा जास्त झाले आहे. तर हडपसर येथील तिन्ही प्रकल्पांचे काम सुमारे ४० टक्के इतके झाले आहे.

महापालिकेने पहिल्या टप्प्यात १७०० घराची लॉटरी काढली होती, त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ११८९ घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद होती, पण या प्रकल्पाला निधी कमी पडत असल्याने कोरोनासाठीच्या खर्चाचा १० टक्के निधी कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे पूर्ण निधी वापरता येणार आहे. तसेच उर्वरित कामांसाठी वर्गीकरणातून सुमारे ३० कोटी रुपये उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. महापालिकेच्या नियोजनानुसार जानेवारी २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने ११८९ घराची लॉटरी काढण्यासाठी अर्ज मागविले होते. सर्व खर्चासह १२.५० लाखापर्यंत वन बीएचके घर मिळत असल्याने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांनी सर्व सुविधांनी युक्त असे घर मिळणार आहे. त्यामुळे सुमारे २२ हजार जणांनी अर्ज केले होते, छाननीनंतर १६ हजार ५०० जणांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

अधिक्षक अभियंता युवराज देशमुख म्हणाले, ‘‘महापालिकेने पहिल्या टप्प्यात १७०० घरांची लॉटरी काढली होती, आता दुसऱ्या टप्प्यात ११८९ घरांची लॉटरी काढली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच तारीख जाहीर केली जाईल.’’

रस्त्यासाठी ८४ लाख रुपये

हडपसर येथील पंतप्रधान आवास योजना प्रकल्पासाठी विकास आराखड्यात १२ मीटरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. तो करण्यासाठी ८४ लाख ७४ हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली.

प्रकल्पाचे नाव - एकूण घरे - दुसऱ्या टप्प्यातील लॉटरीतील घरे

  • खराडी - ७८७ - १३

  • वडगाव बुद्रूक - ११६० - ३२६

  • हडपसर एक - ३४० - २५५

  • हडपसर दोन - १०० - ६७

  • हडपसर तीन - ५८४ - ५२८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com