
पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ पैकी १६ गावांच्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांसाठीचा (एसटीपी) प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे. १६ गावांच्या ‘एसटीपी’साठी ३३२ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेंतर्गत समाविष्ट गावांच्या एसटीपीचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. त्यानुसार राज्य सरकारने मंजूर केलेला संबंधित प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे.