Water Quota : पुणे महापालिका पाणी कोटा वाढवून मागणार

पाटबंधारे विभागाने महापालिकेला २०२३-२४ या वर्षासाठी केवळ १२.८२ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे.
Khadakwasala Dam water
Khadakwasala Dam waterSakal

पुणे - पाटबंधारे विभागाने महापालिकेला २०२३-२४ या वर्षासाठी केवळ १२.८२ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. हा पाणी कोटा लोकसंख्येचा विचार करता अपुरा असल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला पत्र पाठवून पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी प्रशासनातर्फे केली जाणार आहे.

महापालिकेने जुलै २०२३ ते जून २०२४ या वर्षासाठी २०.९० टीएमसी पाण्याची मागणी करणारे अंदाजपत्रक पाटबंधारे विभागाला सादर केले होते. यामध्ये निवासी आणि ये जा करणारी अशी एकूण ७२ लाख लोकसंख्या गृहीत, ३५ टक्के गळती धरून पाण्याची मागणी केली होती. पण पाटबंधारे विभागाने महापालिकेचे दावे फेटाळून लावला.

यामध्ये २३ गावे व १६ संस्थांना महापालिका नाही तर पाटबंधारे विभाग पाणी पुरवठा करतो, पाणी गळती केवळ १३ टक्के आहे त्यामुळे त्यासाठी वाढीव पाणी कोटा देण्यास नकार देत १२.८२ टीएमसी पाणी मंजूर केले आहे.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘महापालिका समाविष्ट गावांना पाणी पुरवठा करत आहे, पाणी पुरवठा योजनांचे कामही सुरु झालेले आहे. काही ठिकाणी टँकरने पाणी दिले जात आहे. तसेच गळती १३ टक्के दाखविणे योग्य नाही. समान पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतरही २० टक्के गळतीची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडे पत्र पाठवून फेर मान्यता घेऊन कोटा वाढविण्याची मागणी केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com