पुणे महापालिका करणार ५ लाख तिरंगा झेंड्याचे मोफत वाटप

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार
Pune Municipal Corporation will distribute 5 lakh tiranga flags for free
Pune Municipal Corporation will distribute 5 lakh tiranga flags for free
Updated on

पुणे - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेकडून ५ लाख झेंडे मोफत वाटप केले जाणार आहेत. यातील काही झेंडे घरोघरी जाऊन वाटप केले जाणार आहेत. तसेच १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे ३०० केंद्रांवरही त्याची व्यवस्था केली जाणार आहे.

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने केंद्र व राज्य सरकारतर्फे ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हा उपक्रम साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी यासाठी ‘हर घर तिरंगा’ या उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी १३ ते १५ आॅगस्ट या दरम्यान घरावर तिरंगा झेंडा लावून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेने या उपक्रमासाठी ५ लाख झेंडे विकत घेण्याचा निर्णय घेतला. या झेंड्याची विक्री केली जाणार होती, पण आता महापालिकेने मोफत झेंडे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (ता. ४) पासून महापालिकेकडे टप्प्याटप्‍प्याने तिरंगा झेंडे उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार वाटपाचे नियोजन केले जाईल.

उपायुक्त सचिन इथापे म्हणाले, ‘‘महापालिका ५ लाख झेंडे खरेदी करत आहे. हे झेंडे नागरिकांच्या घरोघरी जाऊन मोफत वाटप करावेत अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सुमारे ३०० ठिकाणी वाटप केंद्र असणार आहेत.नागरिकांनी नियमांचे पालन करून १३ ते १५ आॅगस्ट या दरम्यान घरावर तिरंगा फडकवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com