जीएसटीतून पुणे महापालिकेला मिळणार दोन हजार कोटीपेक्षा जास्त उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GST

पुणे महापालिकेला शासनाकडून २०२२-२३ मध्ये जीएसटीच्या माध्यमातून २ हजार कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जीएसटीतून पुणे महापालिकेला मिळणार दोन हजार कोटीपेक्षा जास्त उत्पन्न

पुणे - महापालिकेला (Pune Municipal) शासनाकडून २०२२-२३ मध्ये जीएसटीच्या (GST) माध्यमातून २ हजार कोटी पेक्षा जास्त उत्पन्न (Income) मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी प्रतिमहिना १६५ कोटी रुपये मिळत होते, यंदा ही रक्कम १७८ कोटी इतकी झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १५० कोटी रुपये अधिक उत्पन्न असणार आहे.

महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मिळकत कर, बांधकाम परवानगी आणि जीएसटीचा प्रमुख वाटा असतो. कोरोनाच्या काळात दोन वर्ष महापालिकेने चांगले उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षी प्रथमच सहा हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये मिळकत कर विभागाचे १८०० कोटी, बांधकाम विभाग २ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले होते. तर जीएसटीच्या माध्यमातूनही पालिकेला प्रतिमहिना १६५ कोटी रुपयांप्रमाणे १ हजार ९८० कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. यावर्षी पहिल्याच महिन्यांत जीएसटीच्या हिश्श्यापोटी १७८ कोटी रुपये मिळाले आहेत. पुढील वर्षभर दरमहा एवढीच रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होणार होऊन साधारणपणे २ हजार १३६ कोटी रुपये महापालिकेला मिळणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम १५६ कोटीने जास्त असेल, असे मुख्य लेखाधिकारी उल्का कळसकर यांनी सांगितले.