Pune News : कमी दराच्या निविदांचा होणार बंदोबस्त; स्थायी समितीतील बैठकीमुळे ठेकेरादांचे धाबे दणाणले

PMC standing committee tender news : पुणे महापालिकेत ४० ते ५० टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांना चाप बसणार असून, कामाचा दर्जा राखण्यासाठी प्रशासनाकडून निविदा फेटाळण्याचे नवे कडक धोरण लागू करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
PMC standing committee tender

PMC standing committee tender

Sakal
Updated on

पुणे : ठेकेदारांमध्ये काम मिळविण्याच्या स्पर्धेमध्ये महापालिकेने निश्‍चित केलेल्या पूर्व अंदाजपत्रकाच्या तुलनेत४० ते ५० टक्के कमी दराने निविदा भरल्या जात आहेत. त्यामुळे कामाची गुणवत्ता राहात नसल्याने पैसे वाया जात आहेत. आता यावर महापालिका प्रशासनातर्फे बंधने घातली जाणार असून, एका ठरावीक मर्यादेपेक्षा कमी दाराच्या निविदा आल्यास त्या फेटाळून लावल्या जाणार आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज (ता. ५) यावर चर्चा झाल्यानंतर ठेकेदारांचे धाबे दणाणेल आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com