

Pune Municipal Corporation has received the National e-Governance Silver Award for its innovative PMC 360 digital governance project.
Sakal
पुणे : डिजिटल प्रशासन आणि नागरिक-केंद्रित सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुणे महापालिकेला राष्ट्रीय स्तरावरील रौप्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागामार्फत ‘पीएमसी ३६०’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी हा सन्मान देण्यात आला.