

Nomination Process Begins for Pune Municipal Elections
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे जागा वाटप, उमेदवार निश्चित करणे यावर खलबते सुरु असताना उद्यापासून (ता. २३) अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही मुदत ३० डिसेंबरपर्यंत असणार आहे. महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.