

Coordination Meeting Ahead of Pune Municipal Elections 2025
Sakal
निलेश चांदगुडे
धायरी : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत रित्या पार पडावी, यासाठी प्रभाग क्रमांक ३३, ३४ व ३५ मधील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व इच्छुक उमेदवार यांच्यासोबत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक सोमवारी (ता.२२) सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.