

Pune Municipal Election Sees Massive Candidate Rush
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या बाहेर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शक्तीप्रदर्शन केले. गेल्या सहा दिवसांत केवळ ४८ अर्ज दाखल झाले होते. पण आज (ता.केवळ एका दिवसात तब्बल ६९४ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला. उद्या (ता. ३०) शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत.