BJP Finalising First List of PMC Candidates
पुणे : भाजपने उद्या (ता. २८) उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल असे जाहीर केले आहे. पण यापूर्वी देखील २६ तारखेचा यादीचा मुहूर्त हुकल्याने आता आता दुसरा मुहूर्त तरी साधणार का याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपकडून उमेदवारांची यादी अंतिम करताना शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांकडून स्वतःच्या नावाची वर्णी लागावी यासाठी कोअर कमिटीवर दबाव आणला जात आहे.तर काही आमदारांनी त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रतिष्ठापनाला लावली आहे.