pune municipal election result
sakal
पुणे - शहरात गुरुवारी (ता. १५) शांततेत मतदान झाल्यानंतर उमेदवारांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. काय निकाल लागणार, मतदारराजा कोणाला घरी बसवणार, कोणाला महापालिकेत पाठवणार? हे शुक्रवारी (ता. १६) स्पष्ट होणार आहे.
सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार असून, पहिला निकाल येण्यासाठी किमान दोन तासांची वाट पाहावी लागणार आहे. मतमोजणीत पहिल्यांदा टपाल मतांची मोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएम मशिनमधील मतांची मोजणी सुरू होणार आहे.