

Violation of Election Code of Conduct in Pune Municipal Polls
Sakal
पुणे : ऐन महापालिका निवडणुकीच्या काळात मकर संक्रातीचा सण आला असून, या काळात उमेदवाराकडून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेट वस्तूंचे प्रलोभन दिले जाते. त्यावर बंदी असतानाही शहरात भेट वस्तू वाटप बिनधास्तपणे सुरु आहे. त्याचे व्हिडिओ स्टेटसवर ठेवले जात आहेत. यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असले तरी महापालिका प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे.