पुणे महापालिका निवडणुक : राजकीय पक्षांचे चिन्ह असलेले मास्क बाजारात!

Pune Municipal Election
Pune Municipal Electionsakal

सहकारनगर : सद्या निवडणुकीचे बिगुल वाजताच प्रभागात सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते राजकारणावर चर्चा सुरू आहे. त्यातच बाजारात राजकीय पक्षाच्या चिन्हाचे मास्क उपलब्ध झाल्याने आतापासूनच कार्यकर्ते उचूकतेने मास्क खरेदी करून प्रचार करीत आहेत. राजकीय पक्षाच्या मास्कवरून सहकारनगर भागात राजकीय चर्चेला उधाण येत आहे. सहकारनगर भागातील चौका चौकात राजकीय पक्षाचे मास्कवर चर्चा सुरू आहे तर काही नागरिक आपल्या पक्षाचे मास्क खरेदी करीत आहेत आणि औचिताने पाहत आहेत.

यावेळी सलीम शेख (विक्रीते)म्हणाले,मनपा निवडणूक प्रक्रिया प्रभाग रचना जाहीर झाल्या पासून राजकीय पक्षाच्या मास्क ची मागणी वाढली आहे. सद्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप इ. पक्षाचे मास्क उपलब्ध आहेत. नागरिकांच्या मागणी नुसार मास्क उपलब्ध करून दिले जात आहेत. यावेळी रामदास गाडे (पर्वती दर्शन,सामाजिक कार्यकर्ते) म्हणाले, सद्या कोरोनाची परस्थिती पाहता मास्क लावणे गरजेचे आहे.यातून सुरक्षेसाठी मास्क लावला जातो आणि यातून पक्षाचा ही प्रचार होतो. त्यामुळे आतापासूनच कार्यकर्ते उचूकतेने पक्षाचा मास्क खरेदी करून आपला प्रचार करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com