NCP Factions Move Towards Unity in Pune
Sakal
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटप, चिन्ह यावरच चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी यावर चर्चा करत असून, येत्या एक ते दोन दिवसात याची घोषणा होणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.