
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. युतीचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, परंतु कार्यकर्त्यांनी आतापासूनच घरोघरी जाऊन जनसंपर्क वाढवावा आणि दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. कसबा मतदारसंघात आयोजित बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ऐतिहासिक विजयाचे लक्ष्य ठेवण्याचे निर्देश दिले.