

First Day of Pune Municipal Elections: Candidate Filings Yet to Begin
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असताना आज पहिल्या दिवशी संपूर्ण शहरातील एकाही प्रभागात उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही. तर १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून आत्तापर्यंत २ हजार ८८६ अर्जांची विक्री झाली आहे. तर इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी तब्बल २४ हजारापेक्षा जास्त अर्ज दाखल केले आहेत.