

Preventive Action Against Criminals for Municipal Elections
sakal
पुणे : महापालिका निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींकडून मतदारांवर दबाव आणला जाऊ नये, तसेच निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी आतापर्यंत सुमारे पाच हजारांहून अधिक सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.