Pune Municipal Hospital : पुणे पालिका रुग्णालयांना मिळणार ‘डोस’; खाटांची संख्या वाढणार

पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळत असले तरी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
Hospital bed
Hospital bedsakal

पुणे - महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळत असले तरी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला असून, प्रमुख तीन रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, पुरेसे मनुष्यबळ, अत्याधुनिक उपचारांसह चांगल्या सुविधा देण्याचे नियोजन केले आहे.

तसेच, रुग्णालयांमधील खाटांची संख्या १६० ने वाढणार आहे. दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. या आराखड्यास आयुक्त विक्रम कुमार यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे.

मंगळवार पेठेतील कमला नेहरू रूग्णालय, भवानी पेठेतील सोनवणे रूग्णालय आणि येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा यामध्ये समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात यात सिंहगड रस्त्यावरील लायगुडे रुग्णालय, शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालय, हडपसर येथील मगर रुग्णालयाचा समावेश केला जाणार आहे.

या कामात खासगी कंपन्यांनी मदत करण्याची तयारी दर्शविल्याने ‘सीएसआर’च्या माध्यमातून निधी व उपकरणे, वैद्यकीय साहित्य खरेदी केले जाणार आहे.

असे केले जाणार बदल...

  • तीनही रुग्णालयांमधील खाटांची संख्या आणि मनुष्यबळात वाढ होणार

  • राजीव गांधी आणि सोनवणे रुग्णालयात प्रत्येकी २५ ते ३५ खाटा वाढणार

  • कर्मचाऱ्यांची संख्या प्रत्येकी २० ने वाढणार

  • कमला नेहरू रुग्णालयातील खाटांची संख्या १०० ने वाढून ३८० होणार

  • सध्या ३२५ कर्मचारी कार्यरत आहेत, ही संख्या ४२० पर्यंत जाणार

  • रेडिओलॉजिस्ट, सर्जन, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञांसह इतर रोगांवरील शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची नियुक्ती होणार

  • उपकरणांची संख्या वाढवून त्यांचा योग्य पद्धतीने वापर

  • वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांना प्रशिक्षण देणार

  • यासाठी वर्षाला सुमारे चार कोटी रुपये खर्च

महापालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयांत अत्याधुनिक पद्धतीने उपचार देता यावेत यासाठी तयार केलेल्या आराखड्यास आयुक्तांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. दोन महिन्यांत तज्ज्ञ डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

अशी आहे स्थिती...

  • ६० खाटा, ७० कर्मचारी - राजीव गांधी रुग्णालय

  • ७५ खाटा, ५० कर्मचारी - सोनवणे रुग्णालय

  • २८० खाटा, ३२५ कर्मचारी - कमला नेहरू रुग्णालय

  • सुविधा - प्रसूती, बालरोग, डायलिसिस, डोळे तपासणी, ह्रदयरोग, अस्थिरोग, विविध प्रकारच्या चाचण्यांसह शस्त्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com