पुणे : पालिकेच्या उद्यानात गैरसोय ! प्रशासन मात्र मस्त उद्यान प्रेमी त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्या उद्यानात गैरसोय

पुणे : पालिकेच्या उद्यानात गैरसोय ! प्रशासन मात्र मस्त उद्यान प्रेमी त्रस्त.

रामवाडी: कल्याणीनगर, वडगावशेरी, चंदननगर भागात पुणे महानगरपालिके कडून नागरिकांच्या सोयी सुविधा आणि मनोरंजन साठी उभारण्यात आलेले प्रकल्प बंद पडले आहे काही उद्यानात पिण्याच्या पाण्याची सोय नाही तर कुठे सुरक्षितता साठी cctv कॅमेरे नाही,म्युझिकल कारंजे असुन पाण्याचा तुटवडा, काही उद्यानात लहान मुलांची खेळणी गंजलेले व तुटलेल्या अवस्थेत स्वच्छतागृह साफसफाई दररोज केली जात नाही अशा अनेक समस्या पालिकेच्या उद्यानात जाणवत आहे. संबंधित विभागा ने उद्यानातील गैरसोयी दूर कराव्यात अशी मागणी उद्यानप्रेमी कडून केली जात आहे.

कल्याणीनगर येथील कै.दामोदर रावजी गलांडे पाटील उद्यानात लाखो रुपये खर्चून पिण्याच्या पाण्या साठी आर ओ प्लांट बसविण्यात आला होता. गेली दोन वर्षापासून बंद पडला आहे त्याच बरोबर cctv कॅमेरे बंद पडले आहेत.

वडगावशेरी : राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात बुलेट ट्रेन, सेव्हन डी थिएटर , म्युझिकल कारंजे बंद ठेवण्यात आल्याने मोठ्या सह बच्चे कंपनी कडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गणेशनगर : येथील डॉ.अण्णा हजारे उद्यानात पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्याच बरोबर किलबिल कट्टय़ा तील खेळणी गंजलेले आहे तर काही मोडून पडलेले आहेत.फुलराणी बंद पडली आहे.

सोमनाथनगर : येथील उद्यान 2017 पासुन प्रवेश द्वारा वरील नामफलकच्या प्रतिक्षेत आहे.कारंजे बंद आहेत.

बॉम्बे सॅपर्स कॉलनी : येथील कै.मेजर भास्करराव शिंदे उद्यानात कॅमेरे बसविण्यात आले नाही.

स्वराज सावंत : दररोज शाळा ट्यूशन यामुळे उद्यानात जास्त वेळ खेळायला जमत नव्हते पण आता उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. गार्डन मधील बुलेट ट्रेन, कारंजे शो ,लेझर शो , सेव्हन डी थिएटर बंद पडले ते सुरू करावे.

फरियाल लखानी : जेष्ठ महिला : कल्याणीनगर येथे महिना एंट्री पास कार्ड संपल्यावर दोन तीन महिन्याने ते कार्ड आम्हाला मिळते. दररोज एक रुपय देऊन गार्डन मध्ये येतो. काही वेळा सुटे पैसे आमच्या कडे नसतात अशा वेळी अडचण येते. पिण्याच्या पाण्याचे आर ओ प्लॉट बंद पडला आहे. संध्याकाळच्या वेळी उद्यानात साफसफाई केली जावी.

Web Title: Pune Municipal Park Administration However

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top