Pune News : बाणेर-औंध रस्त्यावरील तीनशे झाडांची कत्तल करण्याचा पुणे मनपाचा घाट; नागरिक संतप्त

पुण्यातील बाणेर-औंध रस्त्यावरील दहा ते बारा वर्षांची जुनी झाडं तोडण्याचं कारस्थान महानगर पालिकेने केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. ही वृक्षतोड रोखावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Pune News
Pune News esakal

पुणेः पुण्यातील बाणेर-औंध रस्त्यावरील दहा ते बारा वर्षांची जुनी झाडं तोडण्याचं कारस्थान महानगर पालिकेने केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. ही वृक्षतोड रोखावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

पुण्यातील अनेक भागांमध्ये सध्या मेट्रोचं काम सुरु आहे. विशेषतः मेट्रोच्या कामामुळे विद्यापीठ चौकामध्ये मोठ्या वाहतूक कोंडीचा सामाना वाहनधारकांना करावा लागतो. बाणेर रस्त्यावरही मेट्रोमुळे ट्रॅफिकच्या समस्या उद्भवत आहेत.

Pune News
Mumbai Blast Threat Message: मुंबईतील सहा ठिकाणं बॉम्बनं उडवण्याची धमकी! पोलिसांना आलेल्या मेसेजमुळं खळबळ

बाणेर-औंध रस्ता रुंदीकरणासाठी महानगर पालिकेने जुनी दहा ते बारा वर्षांची झाडं तोडण्याचा उद्योग सुरु केलेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. मनपा बेकायदेशीरपणे झाडं तोडत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

Pune News
Share Market Today: अर्थसंकल्पानंतर आज कसा असेल शेअर बाजार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

''रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली गणेशखिंड परिसरातील झाडं तोडण्यात आलेली आहे. तसाच प्रकार बाणेर, औंधमध्ये सुरु आहे. ही झाडं आम्ही दहा ते बारा वर्षापासून जपली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कुऱ्हाड चालवू नये.'' अशी प्रतिक्रिया शुक्रवारी सकाळी बाणेर परिसरातील नागरिकांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com