
‘‘पुणे महापालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. स्वच्छतेपासून विविध प्रकारच्या कामांवर परिणाम होत आहे,’’ अशा शब्दांत आमदार बापू पठारे यांनी सोमवारी अधिवेशनात प्रश्नोत्तर सत्रात महापालिकेतील अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मांडला.