esakal | स्थायी समितीत आता महिलाराज; 'यांना' मिळाली संधी
sakal

बोलून बातमी शोधा

pune municipal Standing Committee empty post selection declared


भाजपकडून नगरसेविका वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, उज्ज्वला जंगले आणि सुनीता गलांडे यांची वर्णी लागली. राष्ट्रवादीने नगरसेविका नंदा लोणकर, अमृता बाबर यांना स्थायीच्या कारभारात लक्ष घालण्याची जबाबदारी दिली आहे. कॉंग्रेसने लता राजगुरु यांना संधी दिली आहे. शिवसेनेकडून बाळा ओसवाल यांची निवड झाली आहे.

स्थायी समितीत आता महिलाराज; 'यांना' मिळाली संधी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : महापालिकेची आगामी निवडणूक आणि नव्या राजकीय समीकरणे जुळवत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने स्थायी समितीतील नव्या चारही जागांवर अनुभवी आणि नव्या नगरसेविकांना संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसनेही हाच फॉर्म्युला वापरत आपल्या वाट्याच्या तीन जागांसाठी महिलांचीच निवड केली आहे. परिणामी, स्थायी समितीत आता महिलाराज राहणार असल्याचे स्पष्ट आहे. स्थायी समितीच्या नव्या सदस्यांची सर्वसाधारण सभेत सोमवारी निवड झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


भाजपकडून नगरसेविका वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, उज्ज्वला जंगले आणि सुनीता गलांडे यांची वर्णी लागली. राष्ट्रवादीने नगरसेविका नंदा लोणकर, अमृता बाबर यांना स्थायीच्या कारभारात लक्ष घालण्याची जबाबदारी दिली आहे. कॉंग्रेसने लता राजगुरु यांना संधी दिली आहे. शिवसेनेकडून बाळा ओसवाल यांची निवड झाली आहे. स्थायी समितीच्या इतिहास पहिल्यांदाच इतक्‍या प्रमाणात महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवरून कोणत्या गाड्या केल्या रद्द? का? 

loading image