
पुणे - शहरात दूषित पाण्यामुळे गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) हा आजार होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आता शहरातील लहान मोठ्या सर्व सुमारे साडे तीनशे पाण्याच्या टाक्या पुढील महिन्याभरात धुवून काढणार आहेत. यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळित होण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात धायरी, नांदोशी, किरकटवाडी, नऱ्हे, सणसवाडी आदी भागात महापालिकेतर्फे शुद्ध केलेले पाणी पुरविले जात नाही. त्यामुळे या पाण्यातून इ कोलाय हा जीबीएस होण्यास कारणीभूत ठरणारा जिवाणू आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्याभरापासून महापालिकेने या भागातील जीबीएसचे रुग्ण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
विहिरीवरूण होणाऱ्या पाण्यामध्ये क्लोरिन मिश्रित केले जात आहे, शिवाय विहिरीला जाळी बसवून त्यात घाण पडणार नाही याची काळजी घेतली आहे. टँकरसाठी पाणी उपलब्ध करून देणाऱ्या विहिरी, आरओ प्रकल्प यांच्या पाण्यात जीबीएससाठी कारणीभूत असणारा जिवाणू आढळल्यानंतर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
दूषित पाण्यामुळेच जीबीएस होत असल्याचे राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेने (एनआयव्ही) यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून टाक्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. रोजचा पाणी पुरवठा करताना महापालिकेला टाक्या स्वच्छ करताना अडचणी निर्माण होतात, तसेच पाणी पुरवठा विस्कळित होऊन नागरिकांच्या तक्रारी येतात. त्यामुळे आता विशेष मोहीम घेऊन टाक्या स्वच्छ केल्या जाणार आहेत. यासाठी एका महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. रोज वेगवेगळ्या भागातील टाक्या स्वच्छ केल्या जाणार आहेत.
'पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या जाणार आहेत, त्याच सोबत टाक्यांच्या परिसरात स्वच्छता ठेवली जाणार आहे. परिसरातील सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती करून त्यांच्यातील गळतीही थांबविली जाईल. हे काम करताना दैनंदिन पाणी पुरवठा विस्कळित होणार नाही याची काळजी घेतली जाईल.'
- पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
पर्वती जलकेंद्रावर प्रमुख भार
शहरातील मोठा भागात हा पर्वती जलकेंद्रावर अवलंबून आहे. या ठिकाणावरून शहराच्या विविध भागातील टाक्यांना पाणी पुरवठा होतो. त्यामुळे पर्वती जलकेंद्रावरून टप्प्या टप्प्याने प्रत्येक टाकीचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल. त्यामुळे नागरिकांना जास्त त्रास होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.