
Pune Municipal Corporation Election
पुणे - पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर अक्षरशः हरकती आणि सूचनांचा पाऊस पडला आहे. आज (ता.४) शेवटच्या दिवशी तब्बल २ हजार ८९९ हरकती, सूचना निवडणूक शाखेकडे सादर झाल्या आहेत. तर एकूण हरकतीचा आकडा ५ हजार ४९६ इतका झाला आहे. यात प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे-वडगाव बुद्रूक येथून सर्वाधिक २ हजार ६६ हरकती सूचना नोंदविल्या गेल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत आकड्यांची जुळवाजुळव सुरु असल्याने यात आणखी काही वाढ होण्याची शक्यता आहे.