
पुणे, ता. १६ पावसाळ्याचे आगमन होण्यास अवघे काही आठवडे शिल्लक आहेत, तर पूर्व मौसमी पावसाच्या सरी शहरात बरसत आहेत. असे असताना महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यास गती आलेली आहे. आत्तापर्यंत नाले सफाईचे काम ८३ टक्के झाले आहे. तर पावसाळी गटारांचे कामे ७५ टक्के पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही असा दावा प्रशासनाने केला आहे.