

Pune Water Crisis
Sakal
पुणे : शहरातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याच्या गंभीर तक्रारी वाढल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने तातडीच्या उपाययोजनांसाठी २० कोटी २० लाख रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.