

पुणे : हॉटेल व्यावसायिक सतीश सादबा वाघ (वय ५५, रा. मांजरी बुद्रूक) यांचा खून करण्यासाठी भाडेकरूनेच पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी सतीश वाघ यांचे मोटारीतून अपहरण करून त्यांचा खून केला होता.