
Pune Latest News: मित्राच्या बहिणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून तिच्यासोबतच अश्लील चॅटिंग करणाऱ्या एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जांभूळवाडी तलाव परिसरात घडली. या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे.