
Pune murder: अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने तरुणावर पालघनने वार करून खून केल्याची घटना कोथरूड परिसरात घडली. खून झालेला तरुण महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी असून, त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते, त्यातून हा प्रकार घडला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.