
वडगाव शेरी: पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बीआरटी मार्गिका शनिवारी उशिरा काढण्यास सुरुवात झाली. रात्री सोमनाथ नगर चौक, खराडी बायपास व आपले घर या भागातील बीआरटी मार्गिका हटवण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा त्रास कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.