Woman Priest Attack : हातात कुऱ्हाड घेऊन अख्ख्या कुटुंबाला संपवण्याची धमकी! काळभैरवनाथ मंदिराच्या महिला पुजारीसह पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण, 5 जणांवर गुन्हा

Woman Priest Assaulted at Naigaon Temple in Pune : नायगाव येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात महिला पुजारी आणि त्यांच्या पतीला पाच जणांनी मारहाण करून कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी दिली.
Why was the woman priest attacked in Pune temple?

Why was the woman priest attacked in Pune temple?

esakal

Updated on

-सुनील जगताप

उरुळी कांचन (पुणे): नायगाव (ता. हवेली) येथील श्री काळभैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात एक महिला पुजारी आणि त्यांच्या पतीला ५ जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हातात कुऱ्हाड घेऊन संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली (Naigaon temple assault case Pune) आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील ५ जणांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. रविवारी (ता. २४) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com