
पुणे महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामात गंभीर गैरप्रकार समोर आले आहेत. नालेसफाई करताना पोकलेनने काढलेला गाळ पुन्हा नाल्यात टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिबवेवाडी आणि सरकारनगर येथील फुलपाखरू उद्यान परिसरातील दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेने महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.