

A road blockade protest will be held at Alephata on August 9, demanding the Pune–Nashik direct railway line. Organisers have appealed to citizens to join the movement, calling it a public agitation beyond party politics.
Sakal
राजेश कणसे
आळेफाटा :
पुणे-नाशिक सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी आता निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली असून, ९ ऑगस्ट क्रांतीदिनी सकाळी ९ वाजता पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. हे कोणत्याही पक्षाचे किंवा एखाद्या राजकीय नेत्याचे आंदोलन नसून, भावी पिढ्यांच्या हितासाठी उभारलेले जनआंदोलन आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समितीचे सदस्य जयसिंग पोटे ,माजी सदस्य जीवन शिंदे, सचिन वाळुंज, प्रदीप देवकर यांनी दिली.