High Speed Railway : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग काम मार्गी लागणार - रावसाहेब दानवे

भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाची अंतिम मंजूरी मिळून प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावा.
Raosaheb Danve and Shivajirao Adhalrao Patil
Raosaheb Danve and Shivajirao Adhalrao PatilSakal
Summary

भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाची अंतिम मंजूरी मिळून प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावा.

मंचर - भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाची अंतिम मंजूरी मिळून प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावा यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुढाकार घेत नुकतीच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

यावेळी झालेल्या भेटीदरम्यान माजी खासदार आढळराव पाटील यांनी पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे महत्त्व रावसाहेब दानवे यांना पटवून दिले. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला मंजूरी मिळावी यासाठी या भागाचे लोकसभेत तीनवेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यापासून म्हणजे सन २००४ पासून केंद्रीय पातळीपासून सर्वच स्तरांवर या प्रकल्पासाठी मी कसोशीने संघर्ष करीत आलो आहे. १५ वर्षाच्या माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात जवळजवळ प्रत्येक अधिवेशनात याविषयी लोकसभेत आवाज उठविला आहे. त्यास सन २०१६ मध्ये यश येऊन तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पास मंजूरी दिली व कार्यान्वयासाठी 'महारेल'कडे हा प्रकल्प हस्तांतरीत करण्यात आला.

महारेलकडून पुणे-नाशिक या २३५ किमी लांबीच्या सुमारे रू.१६०३९ कोटी रकमेच्या रेल्वे प्रकल्पाचे सेमी हायस्पीड रेल्वेमध्ये समावेशन करण्यात आले. या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर मी व्यक्तीशः लक्ष घालून पाठपुरावा केला असून यासाठी आवश्यक २० टक्के हिस्सा खर्च करण्यास राज्य शासनाची देखील मंजूरी मिळाली आहे.

भारतीय रेल्वे बोर्डानेदेखील या प्रकल्पास मंजूरी दिलेली असून सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या कारणांमुळे या प्रकल्प प्रक्रियेची गती मंदावल्याचे आढळराव यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निदर्शनास आणून दिले.

हा प्रकल्प झाल्यास महाराष्ट्र राज्यातील ऑटो हब म्हणून प्रसिध्द असलेल्या चाकण-खेड भागातील शेकडो कंपन्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील मालाची वाहतुक तसेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक सुलभ होईल. पुणे-नगर-नाशिक हे तीन महत्वाचे जिल्हे एकाचवेळी जोडले जाऊन वाहतुक कोंडीचा प्रश्नही बऱ्याच अंशी सुटून नागरिकांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.

त्यामुळे भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या व महाराष्ट्र शासनाने २० टक्के हिस्सा खर्च करण्यास मंजूरी दिलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाची अंतिम मंजूरी मिळून प्रकल्प लवकरात लवकर सुरू होणेकामी सत्वर कार्यवाहीचे आदेश व्हावेत यासाठी रावसाहेब दानवे यांच्याकडे आग्रही मागणी केली.

आपण या प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी व्यक्तिशः लक्ष घालून रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना योग्य ते कार्यवाहीचे आदेश देणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी आढळराव पाटील यांना सांगितले. दानवे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात बाळासाहेबांची शिवसेना पक्ष जिल्हाप्रमुख भगवानराव पोखरकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, जिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, शिवाजीराव राजगुरू आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com