मध्यरात्री काम संपवून घरी निघालेल्या १७ महिलांना उडवलं! ५ जणींचा मृत्यू, तिघी गंभीर | Pune-Nashik Highway Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune nashik highway accident three 3 women killed severely  14 injured near khed shiroli

Pune Accident News : मध्यरात्री काम संपवून घरी निघालेल्या १७ महिलांना उडवलं! ५ जणींचा मृत्यू, तिघी गंभीर

Pune Nashik Highway Accident News : पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात घडला. भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाला असून तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार जखमी झालेल्या महिलांपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  या अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाला आहे तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

या अपघातग्रस्त महिला अपघात स्थळापासून जवळच असलेल्या एका मंगल कार्यालयात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी आल्या होत्या. मध्यरात्री काम संपल्यानंतर त्या पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा येथे उतरल्या होत्या.

या महिला पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे रस्ता ओलांडत असताना या महिलांच्या घोळक्याला पुण्याकडून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातातनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस चालकाकाा शोध घेत आहेत.साम टिव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Pune News