Manchar News : गायमुख तांबडेमळा येथे साडेसात टन वजनाच्या महानंदीचे अनावरण

भीमाशंकरकडे येजा करणाऱ्या भाविकांना मिळणार महानंदीच्या दर्शनाचा लाभ
Mahanandi
MahanandiSakal

मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ गायमुख-तांबडेमाळा (ता आंबेगाव) येथे महानंदीचे पाषाणातील चार फुट आठ इंच उंचीचे व साडेसात टन वजनाचे शिल्प बसविण्यात आले आहे. या महानंदीचा अनावरण समारंभ गुरुवारी (ता. १५) आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक ऋषि देवव्रतजी व पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक अभियंता दिलीप मेदगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 'हर हर, महादेव जय 'भीमाशंकर' अशा घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी टी अँड टी इन्फा लिमिटेड कंपनीचे संचालक श्रीमंत तांदूळकर, उद्योजक भरत भोर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, बाबुराव तांबडे आनंदराव शिंदे सरपंच प्राजक्ता तांबडे, उपसरपंच मयूर भोर, अवसरी खुर्दचे उपसरपंच अनिल शिंदे, माउली भोर, मारुती भोर, निकिता तांबडे उपस्थित होते.

अभियंता मेदगे म्हणाले, खेड ते मंचर या राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार व वेळेत श्रीमंत तांदूळकर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर कडे ये जा करणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने उभारण्यात आलेला महानंदी लक्ष वेधक ठरणार आहे.नागरिकांना दर्शन होणार आहे. आंबेगाव तालुक्याच्या वैभवात भर टाकणारे हे शिल्प रस्ते परिवहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून तांदूळकर यांनी उभे केले आहे.

'महानंदी शिल्प काळ्या पाषाणातील, सोनेरी मुलायम दिलेले, चार फुट आठ इंच उंची, पाच फुट तीन इंच रुंदी व लांबी सहा फुट पाच इंच आहे. दगड कर्नाटक वरून पुणे येथे मागविण्यात आला. कर्नाटकातील कारागिरांना मूर्ती घडविण्यासाठी दीड वर्ष कालावाधी लागला. नंदीचे वजन साडेसात टन आहे. शेकडो वर्ष शिल्प सुस्थितीत राहिल. वीस लाख रुपये खर्च आला.

- श्रीमंत तांदूळकर, संचालक टी अँड टी इन्फा लिमिटेड कंपनी

'आनंद देणे घेणे असा नंदीचा अर्थ आहे. शिवाचा पवित्र बैल आहे. जो सर्वात महत्त्वाच्या हिंदू देवता पैकी एक आहे. जेव्हा जगदृष्ट बनते तेव्हा फायदेशीर बदल घडून आणण्यासाठी शिव त्यांचा नाश करतो. नंदिनी शिवाचे प्राणी स्वरूप त्याचे वाहतूक साधन आणि त्याचा सर्वात उत्कृष्ट उपासक आहे. अशी आख्यायिक आहे.'

- ऋषि देवव्रतजी प्रशिक्षक, आर्ट ऑफ लिविंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com