Onion Price Protest: कांद्याला २५ रु. हमीभावासाठी आज पुणे-नाशिक महामार्गावर सर्वपक्षीय रास्ता रोको

कांद्याला हमीभाव, अनुदान व निर्यात सुरू करण्याच्या मागण्यांसाठी आंबेगाव, जुन्नर, शिरूर व खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा मंचरजवळ पुणे-नाशिक महामार्गावर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन
The Core Demands: ₹25 Minimum Support Price and Immediate Rollback of Load Shedding

The Core Demands: ₹25 Minimum Support Price and Immediate Rollback of Load Shedding

sakal 

Updated on

मंचर : कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरांच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ अवसरी खुर्द- भोरवाडी (ता. आंबेगाव) येथील नंदी चौकात मंगळवार (ता. 2) रोजी सकाळी साडेनऊ वाजता सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलनाचे निमंत्रक व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com